Powered by Blogger.

Shivlilamrut - Parayan


'Shivalilamrut' is one of the great epic in Marathi and written by 'Shridhar Swami'. Today on the occassion of 'Shridhar swami Punyatithee', we take a pleasure to present this Grantha to our readers. Shivalilamrut is basically translation of 'Bramha-Uttar' (also known as Bramhottar) khanda of 'Skanda Purana'. Our best effort to list all the 'Shivalilamrut Adhyay' here, to make these available to all people who believe in Lord Shiva.


भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे। या पोथीचे परायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्या खालिलप्रमाणे.

एक दिवसीय पारायण

सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे। स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य, मांस भक्षण करू नये। पारायण चालू असता सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी। त्या अवधीत देह धर्म आवरावे. दूध, फळे भक्षण करावीत. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा। पारायणानंतर ॐ नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा १०८ वेळा रुद्रमालेवर जप करावा।
फल म्हणजे - इष्ट कामना पूर्ण होतील।

सप्ताह-पारायण पध्दतिसोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे। रोज एक पारायण याप्रमाणे ७ दिवस ७ पारायणे करावीत।
नियम - वरील प्रमाणे।
फल - सर्व इष्ट कामना पूर्ण होवून गंडांतरे, रोग, मृत्यु, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इ. टळतील। आयुष्य, धन, संतती वाढेल, तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी शिव-सायुज्यता मिळेल।

सप्ताह-पारायण पध्दति
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ” मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे.” अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

सोमवार – अध्याय १ व अध्याय २
मंगळवार – अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार – अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार – अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार – अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार – अध्याय ११ व अध्याय १२
रविवार – अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा 'ॐ नम: शिवाय' या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा )।

अकरावा अध्याय वाचन
फक्त अकरावा अध्याय रोज तीनदा वाचावा। नियम प्रथम पद्धतीत दिल्याप्रमाणे ।
फल - आयुष्य संतती लाभेल। अभक्ष्यभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतील। एक सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळेल.

अकरावा अध्याय श्रवण
अकराव्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही एकादश रूद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते.

बेचाळिस ओव्या पठण
ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या बेचाळिस ओव्यांचे नित्य पठण केले जाते। ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओव्या कामी येतात. रोज सकाली स्नान करून ह्या ४२ ओव्या वाचाव्यात।
फल - सर्व ग्रंथांचे पठण केल्याचे पुण्य मिळते.

या सर्व उपासनेत नित्य नियम पाहिजे। दुर्जनांचा संग टाळावा। चित्त शांत असावे। विकल्प धरु नये। श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा । येत नसल्यास गुरुजींकडून संकल्प करून घ्यावा. शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची वा शिवप्रतिमेची पूजा करावी. सर्व उपासना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व व्रतस्थ राहून करावी.
शिवरात्रीचा उपवास, शिव पूजन, शिव दर्शन, त्या दिवशी शिव मंत्रजाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व इहपर कामनापुर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परम्परागत फलश्रुती प्रसिद्ध आहे।

बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही-भाताचा नैवेद्य ह्या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपुजेत फार महत्त्व आहे.

Visit again for the Shivlilamrut granth adhyay one by one.